Central Bank Jobs Saam tv
naukri-job-news

Central Bank Recruitment: सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; ३५० पदांसाठी भरती; पगार १ लाख रुपये; आजच करा अर्ज

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत ३५० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरीची संधी

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती

३५० पदांसाठी भरती जाहीर

सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.सेंट्रल बँकेत मार्केटिंग ऑफिसर आणि फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

सेंट्रल बँकेत मार्केटिंग ऑफिसर आणि फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २० जानेवारी २०२६ पासून रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे.जर तुम्हाला चांगल्या बँकेत नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे.

३५० पदांसाठी भरती

सेंट्रल बँकेत एकूण ३५० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी मार्केटिंग ऑफिसर पदासाठी ३०० जागा राखीव आहे तर फॉरेन एक्सचेंज पदासाठी ५० जागांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे ही उत्तम संधी आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्याकडे १० दिवसांचा वेळ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होईल.

लेखी परीक्षा झाल्यानंतर मुलाखत घेतली जाईल. ही मुलाखत मार्च किंवा एप्रिल महिन्यात घेतली जाईल. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. २२ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. यामध्ये पोस्टवाइज वयोमर्यादा असणार आहे.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० ते १,०५,३८० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन (AICTE)/ यूजीसीमधून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत सीएफए, सीए, एमबीए पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. मार्केटिंग ऑफिसर पदासाठी AICTE/UGC से MBA/बिजनेस अॅनालिस्टमध्ये ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

अर्ज कसा करावा?

सेंट्रल बँकेतील नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला centralbank.bank.in या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर रिक्रुटमेंट सेक्शनवर जायचे आहे.

यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करायचे आहे. यानंतर आयबीपीएसची वेबसाइटवर ओपन होईल.

यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे.यानंतर लॉग इन करायचे आहे.

तुमची सर्व माहिती भरायची आहे. यानंतर फोटो आणि सही टाकायची आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रिंट आउट काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Silver Earrings Design: सिल्वर कानातल्यांचा भलताच ट्रेंड, हे आहेत 5 लेटेस्ट कानातले डिझाईन्स

Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Sunil Shetty On Marathi Language: मला बोलायला भाग पाडू नका...; हिंदी-मराठी भाषा वादावर सुनील शेट्टीचं सडेतोड विधान

Iron Kadhai Benefits : लोखंडी कढईत जेवण बनवण्याचे 'हे' आहेत ५ फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT