Bank Job Saam Tv
naukri-job-news

Central Bank Jobs: सेंट्रल बँकेत अधिकारी होण्याची संधी; पगार ८५९२०; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Central Bank Of India Recruitment: सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत सध्या झोन ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठ महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफसर पदासाठी भरती सुरु आहे. सेंट्रल बँकेत झोन बेस्ड ऑफिसर्स पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२५ आहे.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.मार्च महिन्यातही परीक्षा होण्याची शक्यता आहे. एकूण २६६ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. (Central Bank of India Recruitment)

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी मेडिकल, इंजिनियरिंग, चार्टड अकाउंटट पदवी प्राप्त उमेदवारदेखील या नोकरीसाठ अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. (Central Bank Jobs)

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी २१ ते ३२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांना ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे तर सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT