BOI Recruitment Saam Tv
naukri-job-news

BOI Recruitment: खुशखबर! फ्रेशर्ससाठी बँकेत नोकरी; ४०० पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

BOI Recruitment 2025: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत ४०० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी

फ्रेशर्ससाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

४०० पदांसाठी होणार भरती

शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँक ऑफ इंडियामध्ये फ्रेशर्ससाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुमच्याकडे कामाचा अनुभव नसेल आणि नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. बँक ऑफ इंडियाने नवी भरती जाहीर केली आहे.

बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे.त्यामुळे जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर आजपासूनच अर्ज करा. बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला प्रॅक्टिकली काम करण्याचा अनुभव मिळेल. याचसोबत तुम्हाला पगारदेखील दिला जाणार आहे. त्यामुळे करिअरची सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये ४०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी bankofindia.bank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२६ आहे.

अप्रेंटिस पदासाठी निवड झाल्यावर तुम्हाला १३००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड लेखी परीक्षा आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

शैक्षणिक पात्रता

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. डिग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज कसा करावा? (Application process)

या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वात आधी NATS पोर्टलवर जा.

यानंतर तुम्हाला तिथे स्टुडंट रजिस्टर किंवा लॉग इन असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला संबंधित बँकेत अप्रेंटिस पदावर क्लिक करुन संपूर्ण फॉर्म भरा.

यानंतर शैक्षणिक माहिती, फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : रात्री दारू पार्टी करून झोपले, सकाळी उठलेच नाहीत, १९ जणांचा मृत्यू

Sunthach Paani: दररोज सकाळी न चुकता प्या सुंठाचं पाणी; मिळतील हे 6 चमत्कारिक फायदे

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, आयटी इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू

Eye Discharge: डोळ्यांच्या कोपऱ्यात चिपाड का जमा होते? कारणं आणि उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT