BMC Job Saam Tv
naukri-job-news

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

BMC Recruitment 2024: इंजिनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या भरती सुरु आहे. बीएमसीमध्ये ६९० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसारख्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.या नोकरीबाबत जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. (Government Job)

बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण ६९० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनियर), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल),तसेच सेकंडरी इंजिनियर ( सिव्हिल), यांत्रिकी आणि विद्युत इंजिनियर (Mechanical And Electrical Engineer) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या नोकरीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ४१८००० ते १३२३३०० रुपये वेतन मिळणार आहे. तर सेकंडरी इंजिनियर पदासाठी ४४९०० ते १४२४०० रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरघोस पगाराची नोकरी मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे. (BMC Recruitment)

सिव्हिल इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजीमध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. तसेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्टशन इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

या नोकरीसाठी तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज लकरायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. तुम्ही २ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. (BMC Recruitment 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT