Government Jobs SAAM TV
naukri-job-news

Government Jobs : सरकारी नोकरीची उत्तम संधी! ४५०० पदांसाठी भरती, कसा करावा अर्ज

Bihar CHO Recruitment 2024 : बिहार स्टेट हेल्थ सोसायटीने कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदांच्या ४५०० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज कसा करावा जाणून घ्या.

Shreya Maskar

बिहारमधील तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी आली आहे.बिहारमधील स्टेट हेल्थ सोसायटीने कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या ४००० हून अधिक जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

बिहार हेल्थ सोसायटीच्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. हा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी shs.bihar.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज १ जुलै म्हणजे आजपासून सुरु झाले आहेत. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२४ आहे. या भरती अंतर्गत एकूण ४५०० सीएचओ पदे भरण्यात येणार आहेत. तुम्ही २१ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करू शकता.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ४७ वर्ष आहे. ज्या उमेदवारांनी B.Sc नर्सिंग केल्यानंतर किमान ६ महिन्यांचा डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केला आहे ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच हा डिप्लोमा भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा स्टेट नर्सिंग कौन्सिलने मान्यता असलेल्या संस्थेतून करणे आवश्यक आहे. याशिवाय पोस्ट बेसिक नर्सिंग कोर्स केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. बिहार हेल्थ सोसायटीच्या सीएचओ पदावर नियुक्त झाल्यास उमेदवारांना दरमहा ४००० रुपयांचे वेतन दिले जाईल.

अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगरी मधील पुरुष उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर उर्वरित प्रवर्ग आणि महिलांसाठी २५० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. यासंबंधित अधिक माहितीसाठी बिहार स्टेट हेल्थ सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Medicines: कोणत्याही लक्षणांशिवाय या ५ औषधांमुळे होऊ शकतं तुमचं हार्ट फेल

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

SCROLL FOR NEXT