BEL Recruitment Saam tv
naukri-job-news

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १ लाख ४० हजार रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही एक सरकारी कंपनी आहे. सरकारी कंपनीत सध्या इंजिनियर पदांसाठी भरती होणार आहे.

Siddhi Hande

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची संधी

प्रोबेशनरी इंजिनियर पदांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रोबेशनरी इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २४ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही bel-india.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी ३४० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंजिनियरिंग केलेले असावे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक पदे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पदासाठी भरली जाणार आहे. एकूण १७५ पदांसाठी भरती होणार आहे.

प्रोबेशनरी इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.ई/बीटेक/बीएससी इंजीनियरिंग ग्रेजुएट, इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/मॅकेनिकल/कॉप्यूटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग एंड कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रोनिक्स पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार

Early Signs of Lung Cancer: बोटं आणि नखांवर फुफ्फुसांच्या कॅन्सरची दिसतात 'ही' लक्षणं; चुकूनही इग्नोर करू नका

Dev Diwali 2025: देव-दिवाळीला कोणत्या देवीची पूजा केल्याने मिळेल सुख-समृद्धी

Night Dinner Time: 2,3 आणि 4... रात्री झोपण्याआधी किती तास जेवले पाहिजे?

Dashavatar : 'दशावतार'ची जादू केरळमध्ये, दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार

SCROLL FOR NEXT