Government Jobs SAAM TV
naukri-job-news

Government Jobs : बँकेमध्ये सरकारी नोकरीची संधी! मासिक उत्पन्न '१ लाख' च्या वर, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Bank Recruitment 2024 : खूप वेळापासून सरकारी नोकरी शोधत असाल तर, बँकेत सरकारी नोकरीची सुर्वणसंधी आली आहे. त्वरित अर्ज करून आपली नोंदणी करा. सविस्तर माहिती वाचा.

Shreya Maskar

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, चांगल्या पगाराची बँकमध्ये नोकरी करण्याची सुर्वणसंधी उपलब्ध आहे. एमपी एपेक्स बँकने अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोंदणी सुरू झाली आहे. तुम्हालाही रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर, शेवटच्या तारखेपूर्वी फॉर्म भरा.

एपेक्स बँकमध्ये बँक कॅडर ऑफिसर, बँकिंग असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर अशा अनेक पदांसाठी भरती सुरू झाली आहे. ५ ऑगस्टपासून अर्ज करण्याची लिंक सुरू झाली असून ५ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण १९७ पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची पात्रता

  • या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदानुसार आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

  • ज्या उमेदवारांनी यूजी, पीजी, सीए, एमबीए, बी.कॉम, एम.कॉम केले आहे ते कॅडर ऑफिसरच्या पदासाठी अर्ज करू शकतात.

  • बँकिंग सहाय्यक पदासाठी संगणक अभ्यासक्रम केलेले पदवीधर अर्ज करू शकतात.

  • सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी पदवी उत्तीर्ण, संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानातील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

  • या पदांसाठी १८ ते ३५ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

निवड कशी केली जाईल?

  • लेखी परीक्षा

  • वैयक्तिक मुलाखत

  • कागदपत्र पडताळणी

  • वैद्यकीय तपासणी

पगार किती?

  • निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन मिळेल.

  • असिस्टंट मॅनेजरचा पगार महिन्याला १ लाख ५ हजार रुपयांपर्यंत असतो.

  • कॅडर ऑफिसर पदाचे वेतन १ लाख ४३ हजार रुपये प्रति महिना असेल.

फी किती?

एपेक्स बँकच्या पदांवर अर्ज करण्यासाठी, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांना १२०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि पीएच प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९०० रुपये शुल्क आहे.

अर्ज कसा करावा?

या पदांसाठी अर्ज करताना बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. कारण हा अर्ज फक्त ऑनलाइन भरता येईल. pexbank.in

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

SCROLL FOR NEXT