Bank Of Baroda Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: परीक्षा नाही थेट नोकरी, बँक ऑफ बडोदामध्ये जॉबची संधी, जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

Bank Of Baroda Recruitment: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. बँक ऑफ बडोदामध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्य बिझनेस कॉरेस्पोडंट कोऑर्डिनेटर पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी bankofbaroda.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. जर तुम्हाला बँकेत चांगल्या पदावर काम करायचे असेल तर या नोकरीसाठी नक्की अप्लाय करा. (Bank Of Baroda Recruitment)

बँक ऑफ बडोदामधील या भरती मोहिमेत २१ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत अधिसूचना बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना फिक्स्ड सॅलरी १५००० रुपये मिळणार आहे तर वेरिएबल सॅलरी १०,००० रुपये मिळणार आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (Bank Of Baroda Job)

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला फॉर्म अधिकृत वेबसाइटवरुन डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहे. क्षेत्रीय प्रबंधक, बँक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालय, जबलपूर, प्लॉट नंबर ११७०, पहिला मजला. शिवमूला टॉवर, जबलपूर, मध्य प्रदेश येथे पाठवायचा आहे.(Bank of Baroda Job Applicaion Process)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT