Anganwadi Bharti: अंगणवाडीत नोकरी अन् पगार तब्बल ११२४००; मुख्यसेविका पदासाठी भरती; पात्रता काय?

Anganwadi Bharti 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अंगणवाडीत मुख्यसेविका पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Anganwadi
Anganwadi BhartiSaam Tv
Published On

Anganwadi Bharti 2024: महिला व बाल विकास विभागाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ३ नोव्हेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्पांतर्गत सरळसेवेच्या कोट्यातील गट क संवर्गात मुख्यसेविका पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०२ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी महिला व बालविकास विभागाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Anganwadi Bharti)

Anganwadi
Metro Job: दिल्ली मेट्रोत नोकरीची संधी; महिना ९६००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

महिला व बाल विकास विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी तुमच्याकडे आहे.

अंगणवाडी मुख्यसेविका/अंगणवाडी सुपरवायजर / पर्यवेक्षिका पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.२१ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

Anganwadi
Jobs In IIT: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार १७७००० रुपये; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

राज्यातील २५ अंगणवाड्यांसाठी मुख्य पर्यवेक्षिका पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या कामांचे पर्यवेक्षण करणे हे मुख्यसेविकाचे काम आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (Anganwadi MukhyaSevika Bharti)

Anganwadi
Railway Jobs: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; १९० रिक्त पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com