Bank Of Baroda Saam Tv
naukri-job-news

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ५९२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये कॉन्ट्रॅक्ट पोस्ट्स (मॅनेजर आणि इतर) अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर आहे. ५९२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केली असावी.(CA/CMA/CFA/CS)/B.E/B.Tech/M.Tech/M.E/MCA पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत कामाचा अनुभव असायला हवा.

बँक ऑफ बडोदामधील नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी फायनान्स विभाग, एमएसएमई, डिजिटल विभागात पदवी प्राप्त केलेली असावी. अर्ज करताना उमेदवाराला ६०० रुपये फी भरायची आहे. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

इंडियन बँक भरती

सध्या इंडियन बँकेतदेखील भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन बँकेत फायनान्शियल लिटरसी काउंसलर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी indianbank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Exclusive: मुख्यमंत्रिपद ते भाजपसोबत युती आणि शिंदेसेना ते राज ठाकरे; उद्धव ठाकरेंची Exclusive मुलाखत

Tourism Place: मनमोहक दृश्ये अन् सुंदर नजारा; कोकणातील या गावात वाहने नाही तर दारासमोर होड्या केल्या जातात पार्क

IPL 2025 Auction, Players List: 574 खेळाडू लिलावाच्या रिंगणात! या 12 मार्की खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

Shani Dev: शनिवारी बांधा काळा धागा, शनिदोष होईल दूर

Maharashtra News Live Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT