BHU Recruitment 2024: बनारस हिंदू विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी?
Banaras Hindu University Job Vacancy Saam TV
naukri-job-news

BHU Recruitment 2024: बनारस हिंदू विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी?

Shreya Maskar

तुम्ही शिक्षण क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असाल तर बीएचयू तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे. येथील अनेक शाळांमध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करताना तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही फॉर्म भरावा लागेल.

एकूण ४८ पदांसाठी बनारस हिंदू विद्यापीठात उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा सेंट्रल हिंदू बॉईज स्कूल, सेंट्रल हिंदू गर्ल्स स्कूल आणि श्री रणवीर संस्कृत विद्यालयासाठी आहेत. याअंतर्गत गट अ आणि गट ब ची पदे भरण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक हे पद गट अ अंतर्गत येते. या पदासाठी 3 जागा रिक्त आहेत. टीजीटी, पीजीटी आणि पीआरटी ही पदे गट ब अंतर्गत येतात. पदव्युत्तर शिक्षकाची ९ पदे, प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाची २९ पदे आणि प्राथमिक शिक्षकाची ७ पदे येथे भरली जाणार आहे.

बीएचयू या पदांसाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करावे लागणार आहेत. १२ जुलै २०२४ ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर १७ जुलै २०२४ ही ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ऑनलाइन अर्ज १२ जुलैच्या संध्याकाळी ५.०० पूर्वी गेले पाहिजेत. ऑफलाइन अर्ज अर्जाची हार्ड कॉपी सर्व आवश्यक कागदपत्रांसह १७ जुलै संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत करावा. ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : ऑफिस ऑफ द रजिस्टर, रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेल, होळकर हाउस बीएचयू, वाराणसी.

या पदांच्या शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेविषयी जाणून घेण्यासाठी बीएचयू च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तिथे सर्व तपशीलवार माहिती मिळेल. bhu.ac.in या पदांसाठी अर्ज करण्याचे शुल्क वेगवेगळ्या कैटेगरीनुसार आहे. गट अ पदांसाठी, जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कैटेगरीमधील लोकांना १००० रुपये शुल्क भरावे लागेल. तर गट ब पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी ५०० रुपये फी भरावी. एससी, एसटी, महिला उमेदवार आणि पीडब्ल्यूबीडी कैटेगरीतील उमेदवारांना विनाशुल्क अर्ज भरता येईल. इंग्रजी, हिंदी, इतिहास, गणित, ज्योतिष, वेद, व्याकरण अभ्यास, साहित्य, उर्दू तत्त्वज्ञान इत्यादी विषयांसाठी शिक्षकांची भरती होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Viral Video: तिकिटासाठी बसमध्ये फ्री स्टाईल फाइट; प्रवाशाची कंडक्टरला 'दे बत्ती'

Maharashtra Live News Updates: शेतात काम करताना विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Indian Twitter Koo : ट्विटरला टक्कर देणारे Koo होणार भारतातून गायब; नेमकं काय आहे कारण? विराट कोहलीसह ९००० व्हीआयपींची होती अकाऊंट

Mumbai Potholes News: मुंबईत आरे दुग्ध वसाहतीत खड्ड्यांचं साम्राज्य!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या करता येणार अर्ज!

SCROLL FOR NEXT