Adivasi Vikas Vibhag Recruitment Saam TV
naukri-job-news

Adivasi Vikas Vibhag Bharti: आदिवासी विकास विभागात विविध रिक्त पदांसाठी भरती, शिक्षणाची अट आणि वयोमर्यादा किती? जाणून घ्या...

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. आदिवासी विकास विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत आणि वसतिगृहात रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024)

एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प अंतर्गत तु्म्हालाही नोकरी मिळू शकते. यासाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्युत आणि प्लंबिंग दुरुस्ती या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी आपले नाव, पत्ता आणि संपूर्ण माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर फाटा, कळवण, नाशिक रोड येथे पाठवायचा आहे.

या नोकरीचे ठिकाण कळवण, सुरगाणा (नाशिक) आहे. ८ जुलै २०२४ ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी उमेदवाराचा अनुभव आणि कौशल्य या आधारावर नोकरी दिली जाईल.

नोकरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्ही तुमचा बायोडाटा खूप चांगल्या पद्धतीने तयार करायला हवा. तुमच्या बायोडाटामध्ये तुमचे शिक्षण, कौशल्य याबाबतची सर्व माहिती लिहायला हवी. त्याचसोबत तुमच्या कामाचा अनुभव, तुम्ही किती ठिकाणी काम केले आहे, याबाबत माहिती टाकायला हवी. जर तुमचा बायोडाटा चांगला असेल तर एचआर तुम्हाला नक्की प्राधान्य देतील. तसेच तुम्ही स्वतः ला खूप चांगल्या पद्धतीने तयार करायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT