Manasvi Choudhary
जेवणानंतर छातीत जळजळ होणे ही सामान्य समस्या झाली आहे. अनेकांना जेवल्यानंतर छातीच्या मध्यभागी अचानक दुखणे किंवा जळजळ होण्याचा त्रास जाणवतो.
अनेकजण याकडे केवळ साधी ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करतात, परंतु वारंवार होणारा हा त्रास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
छातीत जळजळ होण्याचे मूळ कारण आणि त्यामागील सवयी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अति प्रमाणात तळलेले, खूप जास्त मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेवर ताण येतो, ज्यामुळे ॲसिडिटी आणि छातीत जळजळ वाढू शकते. माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
दिवसभरात जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा चॉकलेटचे सेवन केल्याने पोटातील ॲसिड अन्ननलिकेत वर येण्याचा धोका वाढतो.
रात्री उशिरा जेवण करणे आणि जेवल्याबरोबर लगेच झोपणे ही छातीत जळजळ होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. यामुळे ॲसिड रिफ्लक्स होतो, ज्यामध्ये पोटातील आम्ल अचानक वर येते आणि तोंडात आंबट ढेकर किंवा जळजळ जाणवते.
जेवणात हलक्या आणि पचनास सोप्या पदार्थांचा समावेश करा.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घ्या, जेणेकरून अन्न नीट पचेल.
जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी १० ते १५ मिनिटे संथ गतीने चाला.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.