Manasvi Choudhary
ही समस्या दूर करण्यासाठी बाजारातील क्रीम्स किंवा उत्पादनांचा वापर केला जातो, पण अनेकदा यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होताना दिसत नाही.
अशावेळी तुम्ही एक सोपा उपाय करून पाहा. ज्यामुळे तुम्हाला काही दिवसांमध्येच बदल झालेला दिसून येईल.
रात्री झोपताना नेहमी डोक्याखाली उशी ठेवून डोकं किंचित उंचावर ठेवून झोपावे. यामुळे चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली अतिरिक्त द्रव साचून राहत नाही.
डोकं उंचावर ठेवून झोपल्याने डोळ्यांखाली सूज आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
डोके थोडे उंचावर ठेवल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण एकाच ठिकाणी साचून राहत नाही आणि योग्य प्रकारे रक्ताभिसरण होण्यास मदत होते.
या सोप्या पद्धतीमुळे घोरण्याची समस्या किंवा रात्री श्वास घेताना होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.
ज्यांना सायनसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी डोके उंचावर ठेवून झोपणे अत्यंत फायदेशीर ठरते, कारण यामुळे सायनसचा दाब कमी होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.