Manasvi Choudhary
महिलांना वजनाने हलके आणि दिसायला अत्यंत आकर्षक व राजेशाही वाटणारे दागिने घालायला आवडतात.
जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ३ ते ४ ग्रॅम सोन्यामध्ये एखादे सुंदर मंगळसूत्र बनवायचे असेल, तर बाजारात अनेक नवीन आणि ट्रेंडी डिझाईन्स उपलब्ध आहेत.
कमी वजनात अगदी रॉयल लूक देणाऱ्या 5 सुंदर मंगळसूत्र डिझाईन्स कोणते ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
फुलांच्या डिझाईनवर बारीक कटवर्क केलेले हे मंगळसूत्र सध्या महिलांमध्ये खूप ट्रेंडमध्ये आहे. या युनिक पॅटर्नमुळे गळ्यात अत्यंत राजेशाही आणि क्लासी लूक दिसून येतो.
लहान मोत्यांचे आकर्षक झुमके किंवा ड्रॉप्स असलेले हे पर्ल ड्रॉप मंगळसूत्र अतिशय सुंदर दिसते. हे पॅटर्न ट्रेडिशनल साड्या आणि मॉडर्न वेस्टर्न अशा दोन्ही लूकवर अगदी सहज मॅच होते.
सोन्याच्या तार किंवा पट्ट्या एकमेकांत गुंफून तयार केलेले हे मंगळसूत्र लॉकेट अत्यंत आधुनिक आणि हटके दिसते. साध्या आणि सोप्या डिझाईनमध्ये हा एक उत्तम पर्याय आहे.
हृदयाच्या आकाराचे कर्व्ह डिझाईन असलेले सोन्याचे लॉकेट तरुण मुली आणि नवविवाहित महिलांमध्ये सर्वाधिक पसंतीस उतरत आहे. हे दिसायला क्युट आणि फॅन्सी वाटते.
महिलांना नेहमीच लटकन किंवा मण्यांच्या लेयर्ड स्टाईलचे दागिने आवडतात. ३ ते ४ ग्रॅमच्या सोन्यात बनवलेले हे लेयर्ड पॅटर्न साडी आणि ड्रेस या दोन्हीवर अत्यंत उठून दिसते.