Urine Infection : लघवीत सतत फेस दिसतोय? दुर्लक्ष करू नका, 'या' ४ आजारांचा असू शकतो संकेत

Shreya Maskar

लघवीला फेस येणे

कधीकधी लघवी करताना फेस दिसतो किंवा कधीकधी पिवळी लघवी होते. पिवळी लघवी अनेकदा डिहायड्रेशन दर्शवते, परंतु जर लघवीला फेस येत असेल, तर ते अनेक आजारांचे लक्षण असू शकते.

Foamy Urine | pinterest

किडनीच्या समस्या

तुम्हाला किडनीच्या समस्या असतील तर फेस असलेली लघवी दिसू शकते. किडनीशी संबंधित समस्यांमध्ये किडनी स्टोन, क्रॉनिक किडनी डिसीज, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आणि नेफ्रोटिक सिंड्रोम यांचा समावेश होतो.

Kidney Problems | pinterest

युरिन इन्फेक्शन

पिवळी लघवी, लघवी करताना वेदना आणि फेसयुक्त लघवी ही सर्व युरिन इन्फेक्शनची लक्षणे आहेत. मूत्रमार्गात जिवाणूंचा संसर्ग झाला असेल, तर फेसयुक्त लघवीसोबत तीव्र जळजळ, दुर्गंधी आणि वारंवार लघवी होणे ही लक्षणे दिसू शकतात.

Urinary Tract Infection | pinterest

मधुमेह - उच्च रक्तदाब

दीर्घकाळ रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणे आणि उच्च रक्तदाबामुळे देखील फेसयुक्त लघवी होऊ शकते. यामुळे मूत्रपिंडांवर ताण येतो, ज्यामुळे फेसयुक्त किंवा पिवळी लघवी होते.

Diabetes and High Blood Pressure | pinterest

वाढलेले प्रथिने

शरीरात अतिरिक्त प्रथिने असणे ही देखील एक समस्या आहे आणि जेव्हा असे होते, तेव्हा मूत्रपिंडांवर सर्वात आधी परिणाम होतो. प्रथिने लघवीमध्ये आढळू शकतात आणि फेस म्हणून दिसू शकतात. या स्थितीला प्रोटीन्युरिया म्हणतात.

Excess Protein | pinterest

डिहायड्रेशन

कमी पाणी प्याल, तर डिहायड्रेशनमुळे लघवीला फेस येऊ शकतो. ही समस्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त जाणवते.

Dehydration | pinterest

उपाय काय?

त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच पुरेसे पाणी प्या, मीठाचे प्रमाण कमी ठेवा, लक्षणे कायम राहिल्यास युरिन टेस्ट करा आणि क्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा.

What are the remedies? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Urine Infection | AI PHOTO
येथे क्लिक करा...