Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Shreya Maskar

महिलांनी घ्या काळजी

महिलांना युरिन इन्फेक्शन वारंवार होते. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. त्यामुळे महिलांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी, जाणून घेऊयात.

Ladies take care | pinterest

युरिन इन्फेक्शन

युरिन इन्फेक्शन मूत्रमार्गातील संसर्गामुळे होते, ज्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) असेही म्हणतात. हे जीवाणू मूत्रमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि मूत्राशय, मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवतात.

Urine infection | pinterest

युरिन इन्फेक्शनची कारणे

सार्वजनिक किंवा अस्वच्छ शौचालयाचा वापर केल्याने युरिन इन्फेक्शन होते. अस्वच्छ हातांनी तुमच्या गुप्तांगांना स्पर्श करणे टाळा. तुमच्यावर अस्वच्छ शौचालयाचे पाणी उडते.

Causes of Urine Infection | pinterest

मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणे

लघवी करताना तीव्र जळजळ होते. लघवी करताना पोटाच्या खालच्या भागात आणि पाठीत असह्य वेदना होणे. लघवी खूप फिकट किंवा गढूळ असू शकते.

Symptoms of urinary tract infection | pinterest

लघवीतील बदल

लघवी कमी प्रमाणात होऊ शकते, पण ती वारंवार येते. तीव्र दाब जाणवणे, पण फक्त काही थेंब किंवा अगदी थोडी लघवी बाहेर येते.मूत्रमार्गाच्या संसर्गादरम्यान रुग्णाला वाढता थकवा जाणवतो.

Changes in urine | pinterest

उपाय काय?

लघवी रोखून धरण्याचा प्रयत्न करू नका. मूत्रमार्गाचा संसर्ग टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. नेहमी स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला. सार्वजनिक शौचालय वापरताना स्वच्छतेची खबरदारी घ्या.

What is the solution? | pinterest

घरगुती उपाय

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेला आवळा मूत्रमार्गाच्या संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूंची वाढ रोखतो. दिवसातून ४-५ वेळा आवळ्याचा रस प्या.रोज क्रॅनबेरीचा रस प्यायल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गापासून आराम मिळतो.

Home remedies | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पुरुषांनो सावधान! लघवी करताना जाणवणारी 'ही' लक्षणं देतात युरिन इन्फेक्शनचे संकेत

Urine Infection | AI PHOTO
येथे क्लिक करा...