Shreya Maskar
पावसाळ्यात महिलांप्रमाणे पुरुषांमध्येही युरिन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पुरुषांनीही स्वतःची विशेष काळजी घ्यावी.
लघवी करताना किंवा ती करून झाल्यावर लगेचच मूत्रमार्गात तीक्ष्ण टोचल्यासारखे वाटते. जळजळ होते. असहाय्य वेदना होतात.
लघवीचे काही थेंबच पडत असले किंवा मूत्राशय रिकामे असले, तरीही सतत लघवीला जावेसे वाटणे.
लघवी करताना दुर्गंधी येते. पांढऱ्या रक्तपेशी किंवा बॅक्टेरियामुळे लघवी गढूळ किंवा दुधाळ दिसणे.
मूत्रमार्गातील जळजळ आणि सूजेमुळे लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा तपकिरी होणे. कधीकधी लघवीतून रक्त पडते.
पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात. पोटाच्या अगदी खाली, जांघेमध्ये भागात मंद वेदना, दाब किंवा पेटके जाणवतात.
ताप, थंडी वाजणे आणि कमरेच्या खालच्या भागात वेदना होतात. सार्वजनिक शौचालय वापरताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. तसेच वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.