Zombie Deer Disease News Saam TV
देश विदेश

Zombie Deer Disease News : कोरोनानंतर जगाला झोंबी डीअर रोगाचा धोका; अमेरिकेतील केसने चिंता वाढली

What is Zombie Deer Disease : अमेरिकेच्या यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये या आजाराची एक केस निदर्शनास आली आहे. या आजाराच्या प्रसाराबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Zombie Deer Disease :

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1 चे रुग्ण देशभरात वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरातही कोरोना पुन्हा डोकं वर काढताना दिसताना. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या चिंताजनक वातावरणात भर पडणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत झोम्बी डियर या जीवघेण्या आजाराची एक केस समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकेच्या यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये या आजाराची एक केस निदर्शनास आली आहे. या आजाराच्या प्रसाराबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांना या आजाराच्या संथ गतीने प्रसाराची भिती आहे.

या जीवघेण्या आजारावर कोणताही इलाज नसल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. हा रोग सामान्यतः हरणांमध्ये आढळतो, परंतु अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की तो माणसांमध्ये देखील पसरू शकतो. (Latest News Update)

अमेरिकेत या आजाराचे 800 नमुने घेण्यात आले आहे. हरिण आणि इतर प्राण्यामध्ये या आजाराचा संसर्ग आढळला आहे. शास्त्रज्ञांना भीती आहे की हा रोग हळूहळू मानवांमध्ये पसरू शकतो आणि एक मोठा धोका बनू शकतो. साधारणपणे दक्षिण अमेरिका, कॅनडा, दक्षिण कोरिया, नॉर्वे व्यतिरिक्त अमेरिकेतही हा आजार होण्याची शक्यता आहे.

आजाराचे लक्षणे काय?

या आजारामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्याचे आजार उद्भवतात. संसर्ग झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर प्राण्यांमध्ये स्मृतिभ्रंश, थकवा येणे, लाळ गळणे, आक्रमकता आणि वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. ज्यामुळे प्राण्याचा हळूहळू मृत्यू होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT