Zomato CEO Deepander Goyal News Saam Digital
देश विदेश

Zomato CEO Got Married: झोमॅटोचे सीईओ दिपींदर गोयल अडकले मेक्सिकन मॉडेलसोबत लग्नबंधनात, कोण आहे ग्रेसिया मुनोज? जाणून घ्या

Zomato CEO Deepander Goyal Got Married: ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दिपींदर गोयल यांनी नुकतेच दुसरं लग्न केल्याची माहिती आहे. मेक्सिकन मॉडेल ग्रेशिया मुनोजसोबत ते लग्न बंधनात अडकले असून नुकताच हनीमूनवरून परतले आहेत.

Sandeep Gawade

Zomato CEO Deepander Goyal Got Marriaged

ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दिपींदर गोयल यांनी नुकतेच दुसरं लग्न केल्याची माहिती आहे. मेक्सिकन मॉडेल ग्रेशिया मुनोजसोबत ते लग्न बंधनात अडकले असून नुकताच हनीमूनवरून परतले आहेत. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.गोयल यांचं हे दुसरे लग्न असल्याचं बोललं जात आहे. त्यांचं पहिले लग्न आयआयटी-दिल्ली मधील त्यांची वर्गमैत्रिण कांचन जोशी यांच्याशी झालं होतं.

कोण आहे ग्रासिया मुनोज?

ग्रेशिया मुनोज ही मेक्सिकोमध्ये जन्मलेली मॉडेल आहे आणि टेलिव्हिजन होस्ट देखील आहे. ती २०२२ मध्ये अमेरिकेतील मेट्रोपॉलिटन फॅशन वीकची विजेती ठरली आहे. सध्या भारतात असल्याची माहिती तीने इंस्टाग्रामवर दिली आहे. जानेवारी महिन्यातही भारतातील अनेक फोटो शेअर केले होते. त्यामध्ये दिल्लीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची छायाचित्रे होती. ती सध्या भारतात आपल्या घरी असल्याचं इंस्टाग्रामवरील बायोमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिपींदर गोयल हे 41 वर्षांचे असून नवीन पिढीतील आघाडीच्या भारतीय उद्योजकांमध्ये त्यांची गणना होते. 2008 त्यांनी मध्ये त्यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म Zomato ची सुरुवात केली. त्यापूर्वी गोयल हे बेन अँड कंपनीत काम करत होते. Zomato ही स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध कंपनी आहे. बाजारानुसार कंपनीचे मूल्य सध्या दीड लाख कोटी रुपये आहे. अशा प्रकारे, Zomato ची गणना प्रमुख भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये केली जाते.

अलीकडे झोमॅटोही वादात सापडला होता. वास्तविक, कंपनीने शाकाहारी लोकांसाठी एक डेडिकेटेड शुद्ध शाकाहारी वितरण सेवा सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. कंपनीच्या या निर्णयामुळे इंटरनेटवर शाकाहार विरुद्ध मांसाहार असा नवा वाद सुरू झाला. झोमॅटो व्यतिरिक्त गोयल यांनी क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिट देखील सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT