Arvind Kejriwal On New Solar Policy 2024 Saam TV
देश विदेश

Delhi Solar Policy: दिल्लीत सर्वांना मिळणार मोफत 'वीज', केजरीवाल सरकारने सर्वसामान्यांसाठी आणलं नवीन धोरण

Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे.

Satish Kengar

Arvind Kejriwal On New Solar Policy 2024:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल सरकारने सर्वसामान्यांसाठी नवे धोरण आणले असून त्याअंतर्गत आता दिल्लीत सर्वांना मोफत वीज मिळणार आहे.

केजरीवाल सरकारने नवीन सौर ऊर्जा धोरण आणि सोलर धोरण 2024 आणले आहे. यामुळे दिल्लीतील लोकांवरील वीज वीजबिलाचा बोजा कमी होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन सौर धोरणांतर्गत दिल्लीतील जे लोक आपल्या छतावर सौर पॅनेल लावतात त्यांचे वीज बिल शून्य होईल. नवीन सौर धोरणाची माहिती शेअर करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, यामुळे दरमहा 700-900 रुपये कमावण्याची संधीही मिळू शकते. (Latest Marathi News)

केजरीवाल म्हणाले, "दिल्ली सरकारने नवीन सौर ऊर्जा धोरण आणि सौर धोरण 2024 जारी केले आहे. आतापर्यंत 2016 चे धोरण लागू होते, ते देशातील सर्वात प्रगतीशील धोरण होते."

ते पुढे म्हणाले की, ''दिल्लीत 200 युनिटपर्यंत वीज मोफत आहे तसेच 400 युनिटपर्यंत वीज बिल निम्मे आणि त्यावरी बिल आकारले जाते. नवीन सौर धोरणांतर्गत, जे लोक त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवतात, अशा लोकांनी कितीही युनिट वीज वापरली तरीही त्यांना शून्य वीज बिल असेल. याद्वारे तुम्ही दरमहा 700-900 रुपये कमवू शकता.''

केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सौर धोरणांतर्गत, पुढील 3 वर्षांत 500 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसवणे बंधनकारक असेल. दरम्यान, दिल्ली सौर धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : भाजीसाठी लागणारे वाटण जास्त काळ ताजे कसे ठेवावे? जाणून घ्या टिप्स

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT