Spy Jasbeer Singh Arrest 
देश विदेश

Spy Jasbeer Singh : देशासोबत विश्वासघात, पंजाबमधून यूट्यूबरला बेड्या, गद्दार 'ज्योती'सोबत निघालं कनेक्शन

Spy Jasbeer Singh Arrest : पंजाबच्या मोहालीमधून यूट्यूबर जसबीर सिंहला हेरगिरीप्रकरणी अटक. तपासात ज्योती मल्होत्रा, शाकिर रंधावा व पाकिस्तानच्या अधिकारी दानिश यांच्याशी संबंध उघड. जसबीर तीन वेळा पाकिस्तानला गेला होता व पाकिस्तान डे कार्यक्रमातही सहभागी झाला होता.

Namdeo Kumbhar

Punjab Police arrested YouTuber Jasbeer Singh : देशासोबत विश्वासघात करणाऱ्या पंजाबमधील यू-ट्यूबर जसबीर सिंह (Spy Jasbeer Singh Arrest) याला बेड्या ठोकल्या आहेत. पंजाबमधील स्पेशल ऑपरेशन सेलने जसबीर सिंह याला मोहालीमधील रूपनगर गावातून अटक केली. आरोपी जसबीर हा 'जान महल' नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवतो, त्याचे एक मिलियनपेक्षा जास्त ऑलोअर्स आहेत. जसबीर सिंह याला संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखील अटक करण्यात आले आहे. जसबीर सिंह याचे कनेक्शन गद्दार ज्योती म्हलोत्रा हिच्यासोबत निघाले आहेत. जसबीर आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानला जाऊन आल्याचेही तपासातून समोर आले आहे.

जसबीर सिंह याचं कनेक्शन PIO शाकिर उर्फ ​​जट्ट रंधावा याच्यासोबत असल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपी हा दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग आहे. जसबीरने हरियाणातून हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या यूट्यूबर ज्योति मल्होत्रा आणि पाकिस्तानी नागरिक तसेच पाक उच्चायोग अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्याशीही संपर्क ठेवला होता.

ज्योति मल्होत्राच्या संपर्कात जसबीर -

सूतरांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हरियाणामधील हिसारमधून अटक केलेल्या ज्योती मल्होत्रा हिच्या चौकशीमध्ये आरोपी जसबीर याचं नाव समोर आले आहे. जसबीर हा आरोपी ज्योती मल्होत्रासोबत संपर्कात होता. त्यांच्यामध्ये अनेकदा चर्चा झाली.

ज्योति मल्होत्रा याच्यामार्फतच आरोपी जसबीर हा पाक उच्चायुक्ताचा निष्कासित अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात आला होता. प्राथमिक तपासात पोलिसांना आरोपीच्या मोबाइलमधून काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. जसबीरच्या फोनमध्ये काही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या लोकांचे नंबरही आढळले आहेत. हे नंबर त्याने वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केले होते.

३ वेळा पाकिस्तानला गेला -

जसबीर सिंह हा तीन वेळा पाकिस्तानला गेल्याचं तपासात समोर आले आहे. जसबीर हा दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीत झालेल्या पाकिस्तान नॅशनल डे कार्यक्रमात सहभागी झाला होता. जसबीर ३ वेळा (2020, 2021, 2024) पाकिस्तानला देखील गेला होता. त्याच्या मोबाइल फोनमधून पाकिस्तानशी संबंधित अनेक संपर्क क्रमांक मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT