'हुंडा नको मामा...'हुंडा नाकारून स्वतः च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या तरुणाची कहाणी  Saam Tv
देश विदेश

'हुंडा नको मामा...'हुंडा नाकारून स्वतः च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या तरुणाची कहाणी

सासरची मंडळी लग्नात देत असलेला ५ लाख रुपयांचा हुंडा नाकारून तरुणाने जगासमोर आदर्श निर्माण केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : सासरची मंडळी लग्नात देत असलेला ५ लाख रुपयांचा हुंडा नाकारून तरुणाने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. मात्र, आज देखील अनेक भागात हुंडा घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. ज्याची नोकरी जेवढी मोठी आणि जास्त पगाराची, तेवढा त्याला मिळणारा हुंडा अधिक, असे समीकरण समाजामध्ये अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

मात्र, अनेक तरुण ही अघोरी प्रथा बंद करण्याकरिता पावले उचलताना दिसून येत आहे. एका तरुणाने दिलेला हुंडा काही वेळातमध्येच परत करण्याचा निर्णय हाती घेतला आहे. राजस्थान मधील सीकर जिल्ह्यामध्ये देवेद्र शेखावत या तरुणाचे लग्न सोनू कंवर नावाच्या तरुणीबरोबर झाले आहे. यावेळी लग्नाच्या दरम्यान एका कार्यक्रमामध्ये सासरच्या मंडळींकडून वराला ५ लाख रुपयांची भेट देण्यात आली होती.

हे देखील पहा-

मात्र, हुंड्याच्या स्वरुपात देण्यात येणारे हे पैसे घेण्यास नवरदेव देवेंद्रने नकार दिला आहे. नवरदेवाच्या या निर्णयाने अनेकांना सुखद धक्का बसला आहे. अनेकांना तर नवरदेवाने हुंडा नाकारला, यावर विश्वासच बसला नाही. आपला स्वकर्तृत्वावर विश्वास असणाऱ्या स्वतःला विकण्याची इच्छा नसल्याचे देवेंद्रने सासरच्या मंडळींना सांगितले आहे. हुंडा ही अघोरी प्रथा असून जोपर्यंत स्वतःपासून हुंडा नाकारण्याची सुरुवात होणार नाही, तोपर्यंत ही प्रथा बंद होणार नाही.

यामुळे स्वतःपासून सुरुवात करण्याचा निर्णय़ हाती घेतला आहे. इतरांनादेखील आपण हुंडा नाकारण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. स्वतःला विकण्याचा आणि नवरा विकत घेण्याचा ट्रेंड आता बदलत आहे. आता तरुण हुंड्याच्या प्रथेला विरोध करत असल्याचे चित्र बघायला दिसत आहे.

राजस्थानमध्ये एका तरुणीने हुंड्याच्या प्रथेवर अनोखे उत्तर शोधल्याची घटना मध्ये समोर आली होती. हुंड्यात जितके पैसे देणार आहात, त्या पैशात मुलींसाठी हॉस्टेल बांधा अशी मागणी तिने आपल्या आईवडिलांकडे केली होती. हळूहळू समाजाची पावले हे आधुनिक विचारांच्या दिशेने पडत असल्याचे दिसून येत आहे.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT