Surat  PTI
देश विदेश

Ganesh Chaturthi : सूरतमध्ये गणपती मंडपावर दगडफेक, लोकांनी पोलीस चौकीला घेरलं, ६ जणांना अटक

Surat Ganesh Utsav 2024 : सूरतमध्ये गणेशोत्सवादरम्यान दगडफेकीची घटना घडली आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Gujarat Surat Stone Pelting : देशभरात गणेशोत्सवाची धूमधाम सुरु आहे. देशभरात लाडक्या गणपती बाप्पााच्या भक्तीमध्ये लोक तल्लीन झाले आहेत. पण गुजरातमधील सूरतमध्ये मात्र याला गालबोट लागले आहेत. सूरतमध्ये गणेशोत्सवादरम्यान दगडफेकीची घटना घडल्याचं समोर आलेय. सूरतमधील सैयदपुरा भागात काही समाजकंटकांनी गणपती मंडपावर दगडफेक केला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त गणेशभक्तांनी पोलीस स्टेशनला घेराव घालत, कारवाईची मागणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती मंडपावर दगडफेक झाल्यानंतर लोकांचा राग अनावर आला. आक्रोशात असणाऱ्या लोकांनी सैयदपुरा पोलीस चौकीला घेराव घातला. लोकांना शांत कऱण्यासाठी स्थानिक आमदार कांती बलर घटनास्थळावर पोहचले होते. आरोपींना सोडलं जाणार नाही, असे अश्वासन दिले. त्यानंतर लोकांचा राग शांत झाला. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सहा आरोपींना बेड्या -

दगडफेकीनंतर सूरतमधील लोक उग्र झाले होते. त्यांना शांत कऱण्याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला. गर्दी हाताबाहेर जातेय असे दिसल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याशिवाय अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. त्याशिवाय इतर २७ जण ताब्यात आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सूरतच्या सर्व भागात पोलीस तैनात आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

गृहमंत्री काय म्हणाले ?

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ व्हिजुअल्स, ड्रोन व्हिजुअल्स आणि अन्य साहित्याची सध्या पडताळणी केली जात आहे. सर्व आरोपींच्या विरोधात सख्त कारवाई करण्यात येईल. पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT