Crocodiles Viral Video News : गुजरातमध्ये सध्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे अनेकांन जीव गमावावा लागलाय. गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी मगरी पाण्यामधून मानवी वस्तीमध्ये येत असल्याचं समोर आलेय. येथील विश्वमित्रा नदीला देखील पूर आल्याने यातील अनेक मगरी पुराच्या पाण्यासह वाहत मानवी वस्तीत पोहचल्या आहेत. या मगरींचे आजवर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता देखील सोशल मीडियावर मगरींचा एक अतिशय भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन तरुण दुचाकीवर रस्त्यावरून जात आहेत. येथून जाताना त्यांनी आपल्या हातात एक मगर पकडली आहे. या मगरीचे तोंड एका कापडाने घट्ट बांधले आहे. तसेच दुचाकीवर मागे बसलेला तरुण या मगरीला पोटाशी धरून दुचाकीवर बसला आहे. मगरीच्या तोंडाची पट्टी जर उघडली असती तर मगरीने थेट या तरुणाचा फडशा पाडला असता. मात्र जराही भीती न बाळगता तरुण मस्त मजेत पुढे जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गुजरातमधील आहे. विश्वमित्रा नदीला पूर आल्याने एक मगर चालत चालत रस्त्यावर येउन पोहचली होती. मगर आल्यावर तिला कोणतीही इजा होउ नये म्हणून या तरणांनी मगरीचे तोंड कापडाने घट्टा बांधले आणि लहान बाळाप्रमाणे मगर पोटाजवळ घेतली. ही मगर साधारण ४ ते ५ फूट लांबीची दिसत आहे. दोन्ही तरुण मगर घेऊन थेट वन विभागाच्या ऑफिसमध्ये जात असल्याची माहिती आहे.
सोशल मीडियावर @Dixit Soni या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत यावर त्यांनी कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या घरात व्हुव्ज आलेत. तसेच अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्यात. रस्त्यावर तरुण मगर घेऊन जाताना अन्य दुचाकीस्वार त्यांना पाहून भयभीत झाले आहेत.
या आधी देखील सोशल मीडियावर मगरीचा असाच एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये एक मगर थेट एका व्यक्तीच्या दारात येउन बसली होती. सकाळी घराचा दरवाजा उघडताच तिथे मगर दिसली. मगर पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. मात्र नंतर वन विभागाला बोलावून ही मगर पुन्हा निसर्ग अधिवासात सोडण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.