Crime News Saam Tv News
देश विदेश

Crime News: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रियकराचा मृत्यू, हॉटेलच्या बाथरूममध्ये आढळला लटकलेला मृतदेह

Boyfriend girlfriend hotel tragedy: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हॉटेलच्या बाथरूममध्ये एका तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हॉटेलच्या बाथरूममध्ये एका तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील पश्चिम विहारमधील डी क्राउन हॉटेलमध्ये घडली आहे. तो त्याच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये राहत होता. मृताजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र, या घटनेनंतर मुलगी घाबरली आहे. या प्रकरणी पोलीस दोघांच्या कुटुंबियांची चौकशी करत असून, तरूणाच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहे.

बाह्य जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा म्हणाले की, शुक्रवारी सकाळी ७:१२ च्या सुमारास हॉटेल डी क्राउनमध्ये एका तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली. मृत तरूणाचे नाव अभिनव सागर (वय वर्ष २४) असे असून, तो ब्युटी सलूनमध्ये काम करत होता. तो त्याच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये राहत होता. १४ फेब्रुवारीला खोलीतील बाथरूममध्ये जात त्याने रॉडला बेडशीट बांधले आणि गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी गुन्हे आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी खासगी रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, तरूणाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी घटनेची माहिती दोघांच्या कुटुंबाला दिली. माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाने हॉटेल गाठले.

वाद झाल्यानंतर तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

पोलीस चौकशीदरम्यान, मुलीने माहिती दिली. गुरूवारी रात्री हॉटेलमध्ये अभिनवने खोली बुक केली. त्याने मैत्रिणीला बोलावून घेतलं. दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. वाद झाल्यानंतर दोघेही झोपायला गेले. सकाळी उठल्यावर अभिनव बेडवर नव्हता. जेव्हा तिने बाथरूम पाहिलं, तेव्हा अभिनवने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं आढळलं.

तरूणीनं आरडाओरडा केला. पोलीस आले आणि मृताचा फोन जप्त केला. या प्रकरणी पोलीस कुटुंब आणि तरूणीची चौकशी करत असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT