greater noida firing Saam tv
देश विदेश

दिवसाढवळ्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; गोळीबाराचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद, VIDEO

greater noida firing : दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Vishal Gangurde

ग्रेटर नोएडामध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जुन्या वैमनस्यातून तिघांनी कट रचून केली हत्या

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. ग्रेटर नोएडाच्या एकोटेड-1 पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसाढवळ्या एका तरुणाची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. तरुणाच्या हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या तरुण हा लुक्सर गावात राहणार आहे. गोळीबाराची घटना मंगळवारी दुपारी झाली. तिघांनी घराबाहेर घुसून गोळीबार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या छाती आणि शरीराच्या इतर भागावर गोळी लागली. त्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या

जुन्या वैमनस्यातून तिघांनी तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्या करण्यात आलेला तरुण तुरुंगात होता. तुरूंगातून सुटल्यानंतर तिघांनी त्याची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यानुसार, तिघांनी त्याची हत्या केली.

नितीन असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोळीबारात जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान नितीनचा मृत्यू झाला. घटनास्थळी फोरेन्सिक पथक पोहोचलं असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

तत्पूर्वी, तरुणाच्या हत्येनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे. हत्येचा घटनेनंतर पोलीस काय करतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Ayodhya Ram Temple Trust New CEO: राम मंदिराचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा कोण आहेत?

Sleep Health : वयानुसार किती तास झोप गरजेची आहे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: वाशिमच्या दुबळवेल जगदंबा देवीच्या मंदिरात चोरी

SCROLL FOR NEXT