Shocking incident  Saam tv
देश विदेश

Shocking : ७ वर्षांचं प्रेम क्षणात आटलं; सरकारी नोकरी लागताच बायकोने रंग दाखवला, इंजिनीअर नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं

Shocking incident : सरकारी नोकरी लागताच बायकोने रुप दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर बायकोच्या जाचाला कंटाळून इंजिनीअर नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. इंजिनीअर तरुणाचा मृतदेह हॉटेलमधील एका बंद खोलीत आढळला आहे. या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला. 'मी माझ्या पत्नी आणि सासरच्या लोकांच्या मानसिक जाचाला कंटळलो आहे. त्यामुळे टोकाचं पाऊल उचलत आहे. आई-बाबा मला माफ करा, असं म्हणत इंजिनीअर तरुणाने टोकाचं पाऊल उचललं.

'आज तक'च्या वृत्तानुसार, मोहित यादव नोएडा येथील एका सीमेंट कंपनीत फील्ड इंजिनीअर पदावर कार्यरत होता. तो औरैया जनपदच्या दिबियापूरचा राहणारा आहे. काही वर्षांच्या रिलेशननंतर त्याने प्रिया यादवसोबत लग्न केलं. दोघांचं संसार चांगला सुरु होता. लग्नानंतर काही महिन्यांनी प्रियाला बिहारच्या समस्तीपूरमधील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून सरकारी नोकरी लागली. त्यानंतर प्रियाने रुप दाखवण्यास सुरुवात केली. प्रिया तिच्या आई आणि भावाच्या सांगण्यावरून छळ केल्याचा मोहितचा आरोप आहे. घर आणि जमीन बळकावण्यासाठी दबाव टाकू लागल्याचाही मोहितचा आरोप आहे.

आत्महत्या करण्याआधी मोहितने व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत मोहितने म्हटलं की, 'माझी पत्नी प्रिया यादवच्या आईने तिला गर्भपात करायला सांगितला. तिने सोन्याचे दागिने, साडी तिच्याजवळ ठेवल्या. माझी बायको मला धमक्या देऊ लागली आहे'.

'घर आणि संपत्ती नावावर केली नाही तर कुटुंबाला खोट्या हुंड्याच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. माझ्या मृत्यूनंतर न्याय मिळाल्यावरच माझ्या अस्थी नदीत विसर्जि करा. आई-बाबा मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही', असे त्याने आत्महत्येपूर्वी म्हटलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मोहितचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सोपवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT