Cricketer Dies Of Heart Attack 
देश विदेश

Cricketer Death: वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

Cricketer Dies Of Heart Attack: जीममध्ये वर्कआऊट 22 वर्षीय खेळाडूंचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. ही घटना बंगालमध्ये घडलीय.

Bharat Jadhav

  • बंगालमधील २२ वर्षीय क्रिकेटपटू प्रियजीत घोष याचा जिममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू झाला.

  • प्रियजीतच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जाते.

  • रणजी ट्रॉफीत खेळण्याचे प्रियजीतचे स्वप्न होते, ते अधुरं राहिलं.

  • क्रिकेट वर्तुळात आणि प्रियजीतच्या कुटुंबात दु:खाची लाट पसरली आहे.

क्रिकेट वर्तुळातून या सर्वात वाईट बातमी समोर आलीय. जीममध्ये वर्कआऊट करताना 22 वर्षीय युवा खेळाडूचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्यामुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. ही घटना बंगालमध्ये घडली असून क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातेय. प्रियजीत घोष असं हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेल्या क्रिकेटपटूचं नाव आहे.

प्रियजीतला बंगालकडून रणजी ट्रॉफीत खेळावं हे या युवा खेळाडूचं स्वप्न होतं. मात्र या युवा खेळाडूचे स्वप्न अधुरं राहिलं. प्रियजीत हा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलापूरमध्ये राहणारा होता. प्रियजीत याने क्रिकेट करिअरची सुरुवात जिल्हा स्तरावरुन केली होती. मात्र वयाच्या 22 व्या वर्षीच प्रियजीतने जगाचा निरोप घेतला.

प्रियजीत फिट राहण्यासाठी जीममध्ये जायचा. प्रियजीत नेहमीप्रमाणे शुक्रवारी १ ऑगस्टला बोलपूरमधील जीममध्ये गेला होता. वर्कआऊट दरम्यान छातीत दुखू लागलं. त्यानंतर प्रियजीतची तब्येत बिघडली. त्यानंतर जीममधील उपस्थितांनी त्याला रुग्णालयात नेलं. मात्र प्रियजीतचा मृत्यू झाला.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, असं प्रियजीतचं स्वप्न होतं.प्रियजीत प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. प्रियजीतने २०१८-१९ या मोसमादरम्यान अंडर १६ स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला होता. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रियजीतला या स्पर्धेतील कामगिरीसाठी पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. आघाडीच्या फलंदाजांपैकी एक अशी प्रियजीतची बंगालमध्ये ख्याती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT