Rahul Gandhi Lok Sabha speech Saam Tv
देश विदेश

Video: तुम्ही हिंदू नाहीच, भर लोकसभेत PM मोदींसमोर राहुल गांधी यांचं रोखठोक भाषण

Rahul Gandhi Lok Sabha speech: आज लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. त्यांनी आपल्या भाषणातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Satish Kengar

''भगवान शंकर म्हणतात, घाबरू नका, घाबरवू नका आणि जे लोक आपल्याला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा, द्वेष आणि असत्य पसरवतात'', असं आज लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले.

आज लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर भाषण करताना ते म्हणाले की, भाजप हिंसा आणि द्वेष पसरवत आहे.

लोकसभात आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, 'माझ्यावर हल्ला करण्यात आला. सरकार आणि पंतप्रधानांच्या आदेशावरून माझ्यावर २० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. २ वर्षांची शिक्षा...माझी ५५ तास चौकशी झाली. मला भाजप आणि आरएसएसला सांगायचे आहे की. भारताच्या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्या विचारांचा वापर केला आहे.'' यावेळी त्यांनी सभागृहात भगवान शंकराचे चित्र दाखवले.

ते म्हणाले की, ''एकदा मोदीजी आपल्या भाषणात म्हणाले की, भारताने कधीही कोणावर हल्ला केला नाही. याचे कारण भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला की, घाबरू नका, घाबरवू नका.''

राहुल गांधी असं म्हणाल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधींचे वक्तव्य ऐकून पंतप्रधान मोदीही उभे राहिले. तर गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते संतापले आणि म्हणाले की, अशा आक्षेपार्ह गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यांच्यावर सभागृहाचे नियम लागू होत नाहीत का? राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी. अशा प्रकारे सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस, विठुरायाच्या भक्तीत दंगली रिंकू राजगुरू

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

Pakistani Celebrities Banned in India: भारताने 'या' पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर २४ तासांत पुन्हा घातली बंदी

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

SCROLL FOR NEXT