Xi Jinping Is Suffering From Cerebral Aneurysm: Report, China Latest Marathi News Saam Tv
देश विदेश

चीनच्या राष्ट्राध्यक्षांना 'सेरेब्रल एन्युरिझम' हा गंभीर आजार; चायनीज पद्धतीने घेणार उपचार

Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे मेंदूच्या 'सेरेब्रल एन्युरिझम' या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीजिंग: चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मेंदूच्या धोकादायक आजाराने ग्रस्त आहेत. खरं तर, मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की शी जिनपिंग (Xi Jinping) सध्या सेरेब्रल एन्युरिझम (Cerebral Aneurysm) या गंभीर मेंदूच्या आजाराने (illness) ग्रस्त आहेत. या आजाराचं निदान करण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. मात्र जिनपिंग हे पारंपरिक चायनीज औषधांवरच उपचार घेण्यावर ठाम आहेत. (Xi Jinping Is Suffering From Cerebral Aneurysm: Report)

हे देखील पाहा -

एका अहवालानुसार जिनपिंग हे गेल्या अनेक महिन्यापासून आजारी होते. यामुळेच डिसेंबर २०२१ मध्ये ते रुग्णालायत दाखल झाले होते. जिनपिंग यांच्या खराब तब्येतीबाबत अनेक अंदाज लावले जात होते. जेव्हा जिनपिंग यांनी शीतकालीन ओलिंपिक दरम्यान कोणत्याही विदेशी नेत्याला भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. (China Latest Marathi News)

सेरेब्रल किंवा ब्रेन एन्युरिझम म्हणजे काय? (What is Cerebral Aneurysm)

या आजारात मेंदूतील रक्तवाहिनी एका बाजूने कमकुवत होऊन फुग्यासारखी फुगणे याला सेरेब्रल किंवा ब्रेन एन्युरिझम म्हणतात. हा आजार मेंदूच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. हा आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तीलाही होऊ शकतो. शक्यतो ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. विशेषत: ज्यांना उच्च रक्तदाब, अनुवांशिकदृष्ट्या कमकुवत नसा, संसर्ग, दुखापत आणि मेंदूचे नुकसान किंवा ट्यूमर आहेत अशा लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT