Brij Bhushan Sharan Singh Saam tv
देश विदेश

Wrestlers Protest Update: 'एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत: फाशी घेईल': ब्रिजभूषण शरण सिंह

Bhushan Sharan Singh: जोपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन (Wrestlers Protest) मागे घेणार नाही असा पवित्रा या आंदोलक कुस्तीपटुंनी घेतला आहे.

Priya More

Delhi Police: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन (Wrestlers Protest) मागे घेणार नाही असा पवित्रा या आंदोलक कुस्तीपटुंनी घेतला आहे. हे प्रकरण आता आणखी वाढत चालले आहे. अशामध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, अशी माहिती समोर आली होती पण ही माहिती खोटी असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे ब्रिजभूषण यांनी याप्रकरणासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे.

आरोपपत्र होईल दाखल -

कुस्तीपटुंकडून भाजपचे खासदारावर ब्रिजभूषण यांच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी गेल्या महिनाभरापासून सुरु आहे. त्यांन अटक केली जावी अशी मागणी ते करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर आणि नंतर आरोपांची चौकशी सुरू झाली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी पोलिसांना पुरेसे पुरावे मिळाले नाहीत. पोलीस दोन आठवड्यात अहवाल दाखल करू शकतात. ते आरोपपत्र किंवा अंतिम अहवाल असू शकते, अशी माहिती समोर आली होती. पण आता दिल्ली पोलिसांनी ही माहिती चूकीचं असल्याचे सांगितले आहे.

तर मी फाशी घेईन -

दरम्यान, हे प्रकरण इतके वाढले आहे की ब्रिजभूषण यांच्या अटकेसाठी कुस्तीपटुंनी त्यांना मिळालेल मेडल गंगा नदीमध्ये विसर्जित करु असा इशारा दिला होता. अशामध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांनी या प्रकरणाबाबत वक्तव्य केले आहे. 'माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत:ला फाशी घेईन, असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे -

पोलिस सूत्रांवर विश्वास ठेवला तर, आरोप जुने आहेत त्यामुळे पोलिसांनी तपासाअंती गुन्हा दाखल केला. चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आम्हाला आहे. याप्रकरणी अनेक कागदपत्रे सापडली असून वेगवेगळ्या स्तरावर तपास सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर 28 एप्रिलला संध्याकाळी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. कुस्तीपटूंनी याला विजयाच्या दिशेने पहिले पाऊल म्हटले आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्रिजभूषण सिंगवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रौढ कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ब्रिजभूषण यांना अटक का होत नाही? -

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कलम 354, 354ए, 354डी, पॉक्सो कायद्याच्या कलम 10 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये कलम 354, 354ए, 354डी, आणि पॉक्सोचे कलम 10 अजामीनपात्र आहेत. दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला दिला ज्यामध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये आरोपींना 41A अंतर्गत अटक करणे गरजेचे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

Ratnagiri To Kolhapur Travel: रत्नागिरीहून कोल्हापूरला कसे जाल? वाचा सर्वोत्तम वाहतूक पर्याय आणि ट्रॅव्हल टिप्स

Maharashtra Live News Update : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

SCROLL FOR NEXT