Viral Cricket Video: अरे आवरा याला! जडेजाने चौकार मारताच भावाचं 'दरवाजा खिडक्या तोड' सेलिब्रेशन; VIDEO एकदा पाहाच

Fan Celebration After CSK Win: चेन्नईच्या विजयानंतर एका फॅनने अनोखं सेलिब्रेशन केलं आहे
viral cricket video
viral cricket videoinstagram
Published On

Funny Cricket Video: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत ५ गडी राखुन विजय मिळवला. यासह पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

या विजयानंतर चेन्नईच्या फॅन्समध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. दरम्यान चेन्नईच्या विजयानंतर एका फॅनने अनोखं सेलिब्रेशन केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

viral cricket video
WTC Final 2023: IPL स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप! तरीही WTC च्या फायनलसाठी स्टार भारतीय फलंदाज जाणार इंग्लंडला

अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल...

या स्पर्धेतील अंतिम सामना हा या हंगामातील सर्वात रोमांचक सामना ठरला आहे. कारण शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवण्यासाठी ४ धावांची गरज होती.

त्यावेळी स्ट्राईकवर असलेल्या जडेजाने चौकार मारला आणि संघाला विजय मिळवुन दिला. मोहित शर्माने ज्याप्रकारे सुरूवातीचे ४ चेंडु टाकले होते, ते पाहुन असं वाटलंच नव्हतं की तो शेवटच्या चेंडूवर चौकार मारु देईल. मात्र जडेजाने धाडस केलं आणि चौकार मारला. (Latest sports updates)

शेवटच्या चेंडूवर जडेजा काय करतो यावर सर्वांच लक्ष लागुन होतं. जडेजाने चौकार मारला आणि स्टेडिअममध्ये फॅन्स एकच जल्लोष साजरा करु लागु लागले. त्यावेळी एका फॅनने चेन्नई सुपर किंग्ज संघ जिंकला म्हणुन चक्क दरवाजा तोड सेलिब्रेशन केलं आहे. या सामन्यानंतर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, एक फॅन घरी आपल्या मोबाईलवर लाईव्ह सामना पाहतोय. जडेजा शेवटच्या चेंडूवर चौकार मारताच हा फॅन जोरजोराने ओरडू लागतो. तसेच घरातील खिडक्या आणि दरवाजे आपटू लागतो. हा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड होताच जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com