Rakesh Tikait on Brijbhushan Sharan Singh Saam Tv
देश विदेश

Wrestlers Protest: 'ब्रिजभूषण सिंह यांना 9 जूनपर्यंत अटक करा, नाही तर..' राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

Rakesh Tikait on Brij Bhushan Sharan Singh: 'ब्रिजभूषण सिंह यांना 9 जूनपर्यंत अटक करा, नाही तर..' राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा

Satish Kengar

Rakesh Tikait on Brij Bhushan Sharan Singh: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. मात्र अद्यापही सरकारने याची दखल घेतली नाही. यातच आता महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी खाप पंचायतीने केंद्र सरकारला अल्टिमेटम दिलं आहे.

हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आयोजित खाप पंचायतमध्ये राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी नेतेही जमले होते. राकेश टिकैत यांनी मंचावरून केंद्र सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, ''केंद्र सरकारने ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक केली नाही, तर आम्ही जंतरमंतरवर जाऊन आंदोलन करू.'' यासोबतच त्यांनी पैलवानांवर दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली.

काय म्हणाले राकेश टिकैत (Rakesh Tikait gives June 9 ultimatum to arrest Brij Bhushan)

शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, ''केंद्र सरकारकडे ९ जूनपर्यंत वेळ आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक झालीच पाहिजे, या मागणीत कोणतीही तडजोड होणार नाही.तसे न झाल्यास ९ जून रोजी जंतरमंतरवर जाऊन आंदोलन करू. कुस्तीपटूंवरील खटले मागे घ्यावेत आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करावी.'' (Latest Marathi News)

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आणि त्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुस्तीपटूंचा आरोप आहे की, त्यांनी भारतीय कुस्ती महासंघचे (WFI) प्रमुख म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून खेळाडूंचा लैंगिक छळ केला.

दरम्यान, कुस्तीपटूंना देशातील दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा देखील मिळाला आहे. प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि कपिल देव (Kapil Dev) यांच्यासारखे दिग्गज आंदोलक कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

वर्ष १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे संयुक्त निवेदन जारी केले. यात गावस्कर आणि कपिल देव यांनी पैलवानांना कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, असा सल्ला दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT