Wrestler Khali Saam Tv
देश विदेश

The Great Khali: अखेर मल्ल खली भाजपाच्या गाेटात; प्रवेशाचं गुपीत सांगितलं (व्हिडिओ पहा)

पंजाब विधानसभेची निवडणूक येत्या १४ फेब्रुवारीला होणार असून दहा मार्चला मतमोजणी होणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : कुस्तीपटू आणि वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) स्टार दलीप सिंग राणा (Dalip Singh Rana) उर्फ खलीने आज भारतीय जनता पक्षात (bjp) प्रवेश केला. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान माेदी यांचे कार्य माेठं आहे. त्यांच्या कारभाराचा भाग का नसावा असा विचार माझ्या मनात आल्याने भाजपात प्रवेश केल्याचे खलीनं (the great khali) नमूद केले.

खली सध्या पंजाबमध्ये (punjab) कुस्ती अकादमी चालवतात. पंजाबच्या निवडणुकीपुर्वी खलीने भाजपच्या गोटात आला आहे. खली नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी औपचारिकपणे एका कार्यक्रमात पक्षात प्रवेश केला. खली पंजाबमध्ये भाजपचा प्रचार करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंजाब विधानसभेची निवडणूक येत्या १४ फेब्रुवारीला होणार असून दहा मार्चला मतमोजणी होणार आहे.

Dalip Singh Rana in BJP

भाजपात खलीचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी स्वागत केले. यावेळी खली म्हणाला मला भाजपात प्रवेश केल्याचा आनंद वाटत आहे. पंतप्रधान मोदींनी देशासाठी खूप माेठं याेगदान दिलं आहे. त्यांचे कार्य अलाैकिक आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी त्यांच्या कारभाराचा भाग का नसावा, असा विचार माझ्या मनात आला. भाजपच्या (bjp) राष्ट्रीय धोरणामुळे प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केल्याचे खलीनं नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT