WPI inflation Latest Update news in Marathi  SAAM TV
देश विदेश

WPI Index : सर्वसामान्यांना मोठा दिलासा; WPI आधारित महागाई दर ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच शून्याच्या खाली

WPI Inflation Rate : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठी दिलासादायक बातमी आहे. घाऊक महागाई दरात सलग ११ व्या महिन्यात घसरण झाल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.

Nandkumar Joshi

WPI Inflation Rate : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठी दिलासादायक बातमी आहे. घाऊक महागाई दरात सलग ११ व्या महिन्यात घसरण झाल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.

प्रसिद्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक घसरून उणे - ०.९२ टक्क्यांच्या पातळीवर आले आहे. मागील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये WPI १.३४ टक्के इतका होता. सोमवारी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. (Latest Political News)

ऊर्जा घटके, अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि क्रूड घटकांच्या किमतींमधील घसरणीमुळे घाऊक महागाई दरात घसरण बघायला मिळाली आहे. इंधन आणि ऊर्जा घटकांमधील महागाई दर मार्चमध्ये ८.९६ टक्के इतका होता. एप्रिलमध्ये त्यात घसरण होऊन ०.९३ टक्क्यांच्या पातळीवर आला आहे. फेब्रुवारीत हाच दर १३.९६ टक्के इतका होता.

केवळ घाऊक महागाई दरामध्येच नाही, तर किरकोळ महागाई दरातही सातत्याने घसरण झाल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई १८ महिन्यांच्या सर्वात निचांकी पातळीवर आला होता.

सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ४.७ टक्के इतका होता. तर एका महिन्याआधीच म्हणजे मार्च २०२३ मध्ये हाच दर ५.७ टक्के होता.

घाऊक महागाई दर आणि किरकोळ महागाई दरात नोंदवलेल्या घसरणीमुळे एप्रिलमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT