DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीवर अंतिम शिक्कामोर्तब केला आहे. म्हणजेच आता वाढीव डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात जोडला जाणार आहे. वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने जानेवारी ते जून 2023 पर्यंत डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग आहे.
सरकार दर 6 महिन्यांनी कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. महागाई जितकी जास्त तितकीच डीएमध्ये वाढ केली जाते. कामगार ब्युरो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची गणना करते. त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांकच्या (CPI-IW) आधारे केली जाते. (Latest Marathi News)
तत्पूर्वी सरकारने मागील सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. ज्यामुळे डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढला होता. सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै 2021 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये आणखी 3 टक्के वाढ देऊन महागाई भत्ता 31 टक्के करण्यात आला होता. (7th Pay Commission)
डीएमध्ये चार टक्के वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती टक्के वाढ होणार, हे समजून घेऊ. समजा केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. जर आपण 38 टक्के पाहिले तर डीए 6,840 रुपये होतो. तसेच 42 टक्के पाहिल्यास ही रक्कम 7,560 रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात 720 रुपयांची वाढ होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.