NCP Upset on Nana Patole : काँग्रेस नेत्यांनंतर राष्ट्रवादीही नाना पटोलेंवर नाराज? कारणही आलं समोर

Nana Patole News : राष्ट्रवादी काँग्रसनेही नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Nana Patole
Nana PatoleSaam TV
Published On

Congress News : काँग्रेसमधील अंतर्गद वाद नाशिक पदवीधर निवडणुकीत समोर आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरात या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

आशिष देशमुख देखील नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. पक्षांर्तग नाराजीनंतर आता नाना पटोले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रसनेही नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Nana Patole
Sandeep Deshpande Attack News: संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट, हल्ल्याचं कारणही आलं समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे काल बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुका त्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्याबरोबर समन्वय होत नसल्याची माहिती राष्ट्रवादी नेत्यांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

काँग्रेसचे वरीष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात समन्वय ठेवतात पण नाना पटोले यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीमध्ये आक्षेप आहे. महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेला नाना पटोले गैरहजर राहिल्याने चर्चा झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Nana Patole
Daily RashiBhavishya: या राशीच्या लोकांनी स्वत:ची काळजी घ्या; आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात

शरद पवार यांनी याबाबत म्हटलं की काँग्रेसबाबत निर्णय दिल्ली पातळीवर होत असतात. त्याला उशीर होईल, तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. महविकास आघाडी एकत्र निवडणूक कशी लढणार याबाबत ठाकरे काय भूमिका हे जाणून घ्या. तसेच पक्षातील इतर नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील शरद पवार यांनी दिल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com