happiness Saam TV
देश विदेश

World's Happiest Country: जगभरातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर; फिनलँड पुन्हा अव्वल, भारत कितव्या स्थानी?

Fineland Become 1st in Worlds Happiest Country List: संयुक्त राष्ट्राने २०२४ मधील जगभरातील सर्वात आनंदी देशाची यादी जाहीर केली आहे. या यादीत पुन्हा एकदा फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला आहे.

Satish Daud

World Happiest Country List 2024

संयुक्त राष्ट्राने २०२४ मधील जगभरातील सर्वात आनंदी देशाची यादी जाहीर केली आहे. या यादीत पुन्हा एकदा फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला आहे. सलग सातव्यांदा फिनलँडने पहिला क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. दुसरीकडे, भारत अमेरिका आणि चीनसारख्या बलाढ्य देशांचा पहिल्या २० मध्ये देखील समावेश नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्यावर्षीप्रमाणे भारत आनंदाच्या क्रमवारीत १२६ व्या स्थानावर आहे. तर अमेरिका २३ व्या तर चीन ३५ व्या क्रमांकावर आहे. तालिबानचे वर्चस्व असलेल्या अफगाणिस्तान सर्वेक्षणाच्या यादीत सर्वात खालच्या म्हणजेच १४३ व्या क्रमांकावर आहे. दरवर्षी संयुक्त राष्ट्रांकडून जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर केली जाते. (Breaking Marathi News)

या यादीत वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांवर जगभरातल्या १५० देशांचं मूल्यमापन केलं जातं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२४ ची यादी तयार करताना एकूण १४३ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या यादीत फिनलँडने जगातील सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळवला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड यासारख्या देशांचा नंबर लागतो. जगभरातील सर्वात आनंदी देशांचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर एक दशकाहून अधिक काळ अमेरिका आणि जर्मनी हे टॉप २० आनंदी देशांमध्ये होते.

मात्र, इतिहासात पहिल्यांदाच अमेरिका आणि जर्मनी यांच्या आनंदी राहण्याच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. सध्या अमेरिका २३व्या आणि जर्मनी २४व्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोस्टा रिका आणि कुवेत या दोन देशांनी प्रथमच पहिल्या २० स्थानावर प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT