Bodybuilder Illia Golem x social media
देश विदेश

Bodybuilder Illia Golem : ६१ इंच छाती, २५ इंचाचा दंड, रोज १० लोकांचं जेवण खायचा; ३६ व्या वर्षी प्रसिद्ध बॉडी बिल्डरचा मृत्यू

Vishal Gangurde

नवी दिल्ली : अनेक जण फिटनेससाठी दररोज व्यायाम करत असतात. दररोज व्यायाम केल्याने शारीरिक, मानसिक आरोग्य चांगलं राहतं. मात्र गेल्या काही वर्षांत दररोज व्यायाम करणाऱ्या बॉडीबिल्डरचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार बेलारुसमधून समोर आला आहे.

मॉन्स्टर बॉडीबिल्डर नावाने प्रसिद्ध असलेला ३६ वर्षीय इलिया गोलेम याचा अचानक मृत्यू झाला आहे. इलिया गोलेम याच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. इलियालाच्या छातीत कळ आल्यानंतर त्याच्या पत्नीने सीपीआर दिला. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यानतंर त्याला हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गोलेमचं व्यतिमत्व चार चौघात उठून दिसायचं. गोलेमची छाती ६१ इंचाची होती. तर दंड हा २५ इंचाचा होता. गोलेम दिवसाला ७ वेळा जेवण करायचा. तो दररोज १६,६०० कॅलरी पचवायचा. तो दिवसाला १०८ सुशीचे तुकडे आणि दोन किलो मांस खायचा. गोलेमची उंची ६ फूट १ इंच होती.

गोलेमच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी एनाने म्हटलं की, मी रुग्णालयात त्याच्याजवळ होते. तो लवकर बरा होईल, असे वाटत होते. मात्र, डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगताच मला मोठा धक्का बसला'.

६०० पाऊंड वजन उचलायचा गोलेम

गोलेम व्यायामादम्यान, ६०० पाऊंड (272 किलो) वजन उचलायचा. तसेच ७०० पाऊंडचं डेडलिफ्ट करायचा. त्याने आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेत सहभाग नोंदवला नव्हता. तरीही तो चांगला चर्चेत असायचा. गोलेमचे इन्स्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.

लहानपणापासून व्यायाम करायची आवड

गोलेमचं वय १५८ किलो होते. गोलेम कमी वयातच जिम जॉइन केली होती. त्याला अर्नोल्ड आणि सिल्वेस्टर स्टेलोन सारखं व्हायचं होतं. त्याने एका मासिकात त्याचा डाएटचा खुलासा केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

One Nation, One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'वरून सत्ताधारी विरोधकांत जुंपली

Health Tips: कच्ची पपई खाण्याचे आश्चर्यकारक फायदे!

Riteish-Genelia: महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात? वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Budh-sharni Gochar: शनी-बुधाने बनवला अद्भुत संयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

Maharashtra News Live Updates: पुण्यात काँग्रेसने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन

SCROLL FOR NEXT