Chennai News Saam tv
देश विदेश

Chennai News: बाईक थांबवली, पॅन्टची चेन काढली अन्...; पहाटे पाच वाजता महिलेसोबत घडलं भयंकर; VIDEO व्हायरल

Tamilnadu Viral Video: तमिळनाडूतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण महिलेसमोर अश्लील कृत्य करताना दिसत आहे. या महिलेनेदेखील तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा महिलांसोबत काहीतरी चुकीचे घडतानाचे व्हिडिओदेखील असतात. मध्यंतरी एका रॅपिडोचालकाने एका महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता चेन्नईमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक माणूस महिलेसमोर अश्लील कृत्य करताना दिसत आहे.

तमिळनाडूमधील घटना

तामिळनाडूमधील चेन्नई येथील ही घटना आहे. एक बाईकस्वार महिलेसमोर उतरुन अश्लील चाळे करत आहे. हे दृष्य पाहून या महिलेनेदेखील त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. त्याला झाडूने खूप मारले आहे.

महिलेसमोर पॅन्टची चैन काढली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ही घटना घडली. सोमवारी सकाळी ५ वाजता एक महिला रस्त्यावर साफसफाई करत आहे. ही महिला सफाई कर्मचारी आहे.तेव्हा अचानक एक बाईकस्वार तिच्याजवळ येतो आणि थांबतो. तेव्हा महिला त्याला बाईक बाजूला घ्यायला सांगताना दिसत आहे. परंतु या तरुणाने बाईक बाजूला घेण्याऐवजी या महिलेसमोर अश्लील कृत्य केले आहे. तो बाईकवरुन उतरला आणि त्याने आपल्या पॅन्टची चेन काढली. यानंतर तिच्यासमोर अश्लील कृत्य करत होता. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर महिलेला धक्का बसला. तिने तिच्या हातात असलेल्या झाडूने या माणसाला मारहाण केली. त्यानंतर हा बाईकस्वार घाबरुन बाईकवर बसून निघून गेला.

सफाई कर्मचारी महिलेने याबाबत माहिती दिली. तिला हा तरुण कॉलेजचा विद्यार्थी असल्याचे वाटले. परंतु त्याने जेव्हा पॅन्टची चेन काढली तेव्हा तिला धक्काच बसला. तिने त्याला झाडूने मारले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे आता महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. सकाळी महिला सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

पंकजा-धनंजय मुंडे १५ वर्षांनी एकत्र, परळी नगरपरिषदेसाठी युती निश्चित? VIDEO

Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

Mumbai Shocking : मुंबईची पहिली भेट अखेरची ठरली; उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Accident: घराकडे जाताना भयंकर घडलं, भरधाव वाहनाने ३ जिवलग मित्रांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT