Amanjot Kaur Direct Throw: वाह भाई वाह! अमनजोत कौरचं गजब क्षेत्ररक्षण; धाव चोरणाऱ्या खेळाडूच्या दांड्या केल्या गुल, Video Viral

World Cup 2025 Final: डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामना होतोय. या सामन्यात अमनजोत कौरने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज तेहजमिन ब्रिट्सला धावबाद केलं. तिच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे सामना भारताच्या बाजूने झाला.
World Cup 2025 Final:
Amanjot Kaur celebrates after her stunning direct throw run-out of South African batter Tehjmin Brits saam tv
Published On
Summary
  • अमनजोत कौरची जबरदस्त फील्डिंग

  • महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५चा अंतिम सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होतोय.

  • सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांकडून तिचं कौतुक होत आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत भिडत आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघान दमदार सुरुवात केली. भारताला विकेटच मिळत नव्हती, अमनजोतच्या कौरच्या कमाल फिल्डिंगनं भारताला ब्रेक थ्रो मिळवून दिला. अमनजोतने केलेल्या धावबादचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

World Cup 2025 Final:
India W vs South Africa W Final: रिप्लेसमेंट म्हणून आली, फायनलमध्ये चमकली, 'लेडी सेहवाग'ची अंतिम सामन्यात धुव्वाधार बॅटिंग

भारतीय संघानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनेही चांगली सुरुवात केली. नऊ षटकांत एकही विकेट न गमावता ५१ धावा केल्या होत्या. आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला होता. काही केल्या भारतीय गोलंगदाजांना विकेट मिळत नव्हती. भारताला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता होती. हा ब्रेक थ्रो अमनजोत कौरने तिच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने टीम इंडियाला ती विकेट मिळवून दिली.

World Cup 2025 Final:
Shefali Verma History: 'लेडी सेहवाग'चा धमाका; वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात बनवलं शेफालीनं बनवला रेकॉर्ड

भारताकडून रेणुका सिंग ठाकूर १० वे षटक टाकत होती. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तझमिन ब्रिट्सने मिड-विकेटकडे फटका मारून धाव घेऊन एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. अमनजोत कौर मिड-विकेटवर क्षेत्ररक्षण करत होती आणि तिने तिथे खूप चपळता दाखवली आणि चेंडू हातात येताच त्याला स्टंपकडे फेकला. तिने चेंडू पकडला आणि नॉन-स्ट्रायकर एंडवर फेकला. चेंडू थेट स्टंपला लागला, यामुळे तझमिन ब्रिट्स धावबाद झाली.

ब्रिट्सच्या बाद झाल्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात पुनरागमन करता आले. ३५ चेंडूत २३ धावा काढल्यानंतर ब्रिट्स धावबाद झाली. तिच्या खेळीदरम्यान तिने दोन चौकार आणि एक षटकार मारला. ब्रिटीसनंतर तिसऱ्या क्रमांकावर अ‍ॅनेके बॉश फलंदाजीसाठी आली. ती सहा चेंडूंत शून्यावर बाद झाली, श्री चर्नीला एलबीडब्ल्यू. सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला अजूनही २०० पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com