Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: विमानात दे दणादण! विंडो सीटवरुन राडा, पोरींनी अक्षरशः झिंज्या उपटल्या; पाहा Viral व्हिडिओ

या तरुणींच्या मारामारीमुळे विमानाने तब्बल दोन तास उशिरा टेक ऑफ केले, यानंतर एअर लाईन कंपनीनेही त्यांना अद्दल घडवली आहे.

Gangappa Pujari

Viral Video: गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी तरुणींमध्ये मारामारी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कॉलेजमधील वाद, बॉयफ्रेंडवरुन भांडणे अशा अगदी शुल्लक कारणांवरुन तरुणी मारामारी करताना दिसतात. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

सध्या विमानामधील विंडो सीटवरुन झालेल्या वादानंतर दोन तरुणींंमधील मारामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या तरुणी अक्षरशः एकमेकींचे केस पकडून मारामारी करताना दिसत आहेत. (Viral Video)

याबाबत अधिक माहिती अशी की, विमानातील दोन तरुणींच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ब्राझिलच्या जीओएल एअरलाईन्सच्या विमानातील हा व्हिडिओ असून विंडो सीटवरुन या तरुणींमध्ये वाद झाला. आणि त्यानंतर या दोघींनीही जोरदार मारामारी करायला सुरूवात केली.

या दोन महिलांच्या वादाचा बाकी प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला, कारण त्यांच्या भांडणामुळे विमानाने तब्बल दोन तास उशिरा टेक ऑफ केले. त्यांच्या या हाणामारीचा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला आहे.

ब्राझिलच्या न्यूज आऊटलेटनुसार, दोन कुटुंबात विंडो सीटवरून हा वाद सुरू झाला. एका अपंग मुलासाठी सीट बदली करुन घेण्यासाठी एका महिलेनं दुसऱ्या प्रवासी महिलेला विनंती केली. पण त्या महिलेने रागाच्या भरात दुसऱ्या महिलेसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. विमानात असणाऱ्या कॅप्टनने आणि क्रु मेंम्बरने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही या दोघींमध्ये चांगलीच जुंपली.

दोन्ही महिला प्रवासांमध्ये झालेल्या भांडणाची एअरलाईन्सकडून तातडीनं दखल घेण्यात आली. त्यांच्या या वादानंतर भांडणाऱ्या महिलांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा प्रवासही रद्द करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये अशा अनेक घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

काही दिवसांपुर्वी एका प्रवाशाने महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचीही बातमी समोर आली होती, त्यामुळेच अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

Railway News : मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! आसनगाव-कसारा नव्या मार्गिकेबाबत सॉलिड अपडेट!

Cancer Risk In Men: सतत लघवी होतेय? साधी वाटणारी ही समस्या असू शकते कॅन्सरचं लक्षण; पुरुषांनी वेळीच सतर्क व्हा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख आली समोर, आयोगाला कोर्टाने दिली पुन्हा मुदत, वाचा

SCROLL FOR NEXT