Jammu Kashmir Saam Tv
देश विदेश

कुलगाममध्ये काश्मिरी पंडित महिलेची हत्या, दहशतवाद्यांनी शाळेत घुसून झाडल्या गोळ्या

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमध्ये पंडितांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. दहशतवाद्यांनी कुलगाममधील मंगळवारी गोपालपुरा भागात असलेल्या शाळेमध्ये घुसून महिला शिक्षिकेवर गोळीबार केला. या घटनेत महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली. त्यानंतर या महिला शिक्षिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कुलगामच्या गोपालपुरा भागात दहशतवाद्यांनी एका महिला शिक्षकावर गोळीबार केल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे. रजनी असे या शिक्षकाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. ती सांबा येथील रहिवासी असून तिच्या पतीचे नाव राजकुमार आहे. ती कुलगाम गोपालपोरा भागात असलेल्या शाळेमध्ये शिक्षिकेचं काम करत होती.

या प्राणघातक गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरिना यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा आता शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

SCROLL FOR NEXT