Woman beat rickshaw driver in noida saam tv
देश विदेश

काय चाललंय काय?...रिक्षा कारला घासल्याचं कारण झालं, महिलेने रिक्षाचालकाच्या १७ थपडा लगावल्या

एका महिलेनं रिक्षाचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नरेश शेंडे

नोएडा : मॅक्स ग्रॅंड सोसायटीत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते श्रीकांत त्यागी (Shrikant Tyagi) यांचा प्रकरण ताजं असनाच आता याच परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिलेनं रिक्षाचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. नोएडातील रस्त्यावर एका रिक्षा चालकाने कारला धक्का दिल्याने संतापलेल्या महिलेनं रिक्षाचालकाला चांगलचं धुतलं. महिलेनं रिक्षाचालकाला शिवीगाळ करत एक नाही, तर तब्बल १७ वेळा कानशिलात लगावली. एव्हढच नाही तर महिला चालकाला मारहाण (woman beat Autorickshaw driver) करत असताना कपडेही फाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

महिला मारहाण करत असताना रिक्षाचालक दिलगीरी व्यक्त करत कौंटुबिक तणावामुळं घाईत रिक्षा चालवत असल्याचं सांगताना व्हिडिओत दिसत आहे. तरीही आक्रमक झालेली महिला चालकाला मारहाण करते. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केली आहे.

नोएडा पोलिसा्ंनी ट्विट करून म्हटलं की, रिक्षाचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार तत्काळ सदर महिलेला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रिक्षाचालकाने दिलेल्या जबाबानंतर नोएडाच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, महिलेनं केलेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT