Wife files divorce due to husband’s hygiene Saam TV news
देश विदेश

Divorce: '३ दिवस एकच अंडरवेअर घालतोस, आंघोळ करत नाहीस...मला काडीमोड हवाय' पत्नीचं डिव्हॉर्स लेटर व्हायरल

Wife files divorce due to husband’s hygiene: अजब कारणामुळे बायकोनं घटस्फोटाची मागणी केली. नवऱ्याची आंघोळ न करणं, तिनच दिवस तीच अंडरवेअर घालणं हे कारण ठरलं. सोशल मीडियावर हे पत्र जोरदार व्हायरल झालं आहे.

Bhagyashree Kamble

नवरा - बायकोचं नातं अतुट असतं. विश्वास आणि प्रेमाच्या जोरावर टिकतं. पण अनेकदा वाद होतात. वाद विकोपाला जातो. टोकाचं भांडण झाल्यावर बऱ्याचदा डिव्हॉर्सही होतो. अशावेळी नात्यातील गांभीर्य आणि त्यातील वेगळी बाजू समोर येते. घरगुती कलह, आर्थिक परिस्थिती, विवाहबाह्य संबंध किंवा संशय या कारणांमुळे डिव्हॉर्स होतात. पण एका महिलेनं पतीकडून डिव्हॉर्स घेण्यासाठी अजब कारण सांगितलंय. त्या महिलेचा डिव्हॉर्स लेटर सध्या व्हायरल होत आहे.

एका महिलेनं नवऱ्याच्या काही विचित्र सवयींमुळे काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. तिने डिव्हॉर्स घेण्यासाठी एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये तिनं डिव्हॉर्स घेण्यामागचं कारण सांगितलं आहे. तिने सांगितलेलं कारण वेगळं आणि अजब होतं. तिने सांगितलेलं कारण ऐकून आपल्याला नक्कीच हसू आवरणार नाही. नेटकरी देखील डिव्हॉर्स लेटर पाहून हैराण झाले आहेत. क्षुल्लक कारण देऊन कुणी घटस्फोट देतं का? असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे.

या डिव्हॉर्स लेटरमध्ये महिलेनं लिहिले की, 'डिअर अंकित.. खरंतर तू 'डिअर' या शब्दाला पात्र नाहीस. मी तुला आणि तुझ्याला स्वाभावाला कंटाळली आहे. मी हे लग्न आणखी नाही टिकवू शकत. तू आंघोळ करत नाही. तू तीन - तीन दिवस तीच अंडरवेअर घालतोस. ज्या दिवशी आंघोळ करतोस, तेव्हा बेडवर ओला टॉवेल तसाच टाकून जातोस. तुला पैशांची किंमत नाही. तू फ्लशही करू शकत नाहीस. तू मुर्ख आहे. माझा वकिल लवकरच तुला डिव्हॉर्स पेपर पाठवले..गुडबाय'

सोशल मीडियावर सध्या हे डिव्हॉर्स लेटर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या लेटरवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने 'तुमचं हस्ताक्षर खूप सुंदर आहे', तर काहींनी महिलेसोबत फ्लर्टिंग केली आहे. तर दुसऱ्याने, 'तुम्हाला बेस्ट फ्रेंड हवाय का?' असा प्रश्न विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर डिव्हॉर्स लेटर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT