Woman feeds curd rice to stray dog at a railway station in West Bengal
Woman feeds curd rice to stray dog at a railway station in West Bengal Saam Tv
देश विदेश

Viral Video : जेवणात दहीभात, सोबत म्युझिक; कुतूश नावाच्या श्वानाचे असे होतात लाड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डम डम, पश्चिम बंगाल: मला दहीभातच हवाय आणि जेवताना गाणीही ऐकायची आहे असा अट्टहास लहान मुलं आपल्या पालकांकडे करत असतात. मग आईही आपल्या मुलाला हाताने भरवते त्याच्यासाठी मोबाईमध्ये गाणी लावते. माणसाचं ठिक आहे, पण जर एखाद्या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यानेच (Street Dog) जर असा अट्टहास केला तर? होय. असंही झालंय. पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका महिलेकडे एक कुत्रा असाच हट्ट करतो. बरं कुत्रा जर पाळीव असेल तर समजू शकतो पण, हा श्वान पाळीव नसून डम डम रेल्वे स्थानकावर असलेला भटका कुत्रा आहे. या कुत्र्याला एक महिला दररोज दहीभात खाऊ (curd rice) घालले, तेही लहान बाळाप्रमाणे आपल्या हातानं. हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Viral video: Woman feeds curd rice to stray dog at a railway station in West Bengal, gets praised)

हे देखील पाहा -

या कुत्र्याचं नावंही तसं मस्तचं. हा श्वान पाच वर्षांचा असून त्याचं नाव कुतूश आहे. पश्चिम बंगालमधील डम-डम रेल्वे स्थानकावरील हा ९६ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला प्लॅटफॉर्मवर बसते आणि पांढऱ्या रंगाच्या भटक्या कुत्र्याला खायला घालण्यासाठी हाताने दही भाताचे गोळे बनवते. स्त्रीच्या शेजारी शांतपणे बसलेला कुत्रा त्याला दिलेला भाताचा प्रत्येक गोळा खातो. बरं एवढंच नाही, तर या श्वान महाशयांना जेवताना गाणीही ऐकायला हवी असतात. मग ही महिला आपल्या मोबाईलवर त्याला गाणी लावून देते आणि मग कुतूश पोटभर जेवतो.

या महिलेने सांगितले की, ती कुत्र्याला जेवण भरवण्यासाठी दररोज तीन वेळा स्टेशनवर येते. फेसबुक वापरकर्त्यांनीही या व्हिडिओमधील स्टेशन ओळखले आहे. या कुत्र्याची काळजी घेतल्याबद्दल अनेकांनी महिलेचे कौतुक केले. श्वानप्रेमींसाठी ही घटना तशी नवी नसावी. कारण ज्यांच्या घरात श्वान पाळला जातो त्यांना याचा अनुभव बऱ्यापैकी असतो. श्वान पाळणं म्हणजे अगदी लहान मुलासारखी त्याची काळजी घ्यावी लागते, त्याच्याशी खेळावं लागतं. त्यामुळे हा व्हिडिओ श्वानप्रेमींसाठी नक्कीच खास आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT