सारा तेंडुलकरच्या चाहत्यांना गोड बातमी; लवकरच करणार बॉलीवूडमध्ये एन्ट्री?

सारा लवकरच बॉलीवुडमध्ये प्रवेश करू शकते, या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये आनंद झाला आहे.
Sara Tendulkar
Sara TendulkarSaam TV

सचिन तेंडुलकरची मुलगी (Sachin Tendulkar Daughter) सारा तेंडुलकरचे नाव कायम क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Shubman Gill) चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सारा तेंडुलकर चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण काही वेगळेच आहे. सारा लवकरच बॉलीवुडमध्ये प्रवेश करू शकते, या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये आनंद झाला आहे. साराने नुकतेच आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर आपले बालपणीचे काही फोटो शेअर केले होते. अलीकडेच सारा आयपीएल सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Sara Tendulkar
Sara TendulkarSaam TV

बॉलीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सारा तेंडुलकर लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करु शकते. अलीकडेच ती तिच्या मित्रासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. तो व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता. क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने ती आधीच मीडियाच्या चर्चेत असते.

सूत्रांच्या माहितीनुसार सारा तेंडुलकरला अभिनयाची आवड आहे असे सांगितले जाते. तिला बॉलीवूडचीही आवड आहे. एवढेच नाही तर सारा तेंडुलकर अभिनय शिकण्यासाठी क्लासेस घेत असल्याचे बोलले जात आहे. काही ब्रँड्ससोबतही तिने जवळून काम केले आहे. साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षणही घेतले आहे, तरी ती बॉलिवूडमध्ये आपले करिअर करू शकते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com