Viral Video x
देश विदेश

लग्नात नाचताना अचानक कोसळली, स्टेजवरच महिलेचा मृत्यू; घटनेचा Video Viral

Video : लग्नाच्या कार्यक्रमामध्ये नाचत असतानाचा एक महिला स्टेजवरच कोसळली. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. लग्नातल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या कार्यक्रमामध्ये काहीजण नाचत असल्याचे पाहायला मिळते. कार्यक्रमामध्ये नाचत असताना स्टेजवर एक महिला कोसळते. या महिलेचा स्टेजवर कोसळल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१९ ऑगस्ट) रात्री तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील ममल्लापुरम येथे एका लग्नच्या रिसेप्शनमध्ये नाचताना एका महिलेचा मृत्यू झाला. रिसेप्शनमध्ये डान्स सुरु असताना महिलेला स्टेजवर बोलवण्यात आले होते. तेव्हा ही महिला स्टेजवर गेली आणि नाचताना स्टेजवरच कोसळली. या महिलेचे नाव जीवा असे आहे.

कांचीपुरम येथील रहिवासी जीवा आणि तिचे पती ज्ञानम हे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या लग्नात एका खासगी कार्यक्रमासाठी गेले होते. या निमित्ताने लोकप्रिय तमिळ पार्श्वगायक वेलमुरुगन यांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा वेलमुरुगन यांनी प्रेक्षकांना स्टेजवर यायला सांगितले. तेव्हा जीवा स्टेजवर गेल्या होत्या.

स्टेजवर नाचताना जीवा अचानक कोसळल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पण शुद्धीवर न आल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी जीवा यांना मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जीवा यांचा मृत्यू कोणत्या कारणांमुळे झाला याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती

Voter Duplication: सत्ताधारी आमदाराच्या पत्नीचं मतदार यादीत दोनदा नाव|VIDEO

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो प्रवास करत घ्या बाप्पाचं दर्शन; गणेशोत्सवानिमित्त नवं वेळापत्रक जारी

Money In Dreams: स्वप्नात पैसे दिसणे शुभ की अशुभ?

SCROLL FOR NEXT