Kalyan : १५ वर्षीय मुलगी गरोदर, प्रसूतीनंतर जिवंत अर्भकाला कचऱ्यात फेकलं; कल्याणमध्ये २२ वर्षीय नराधमाला अटक

Kalyan Crime : कल्याणमध्ये कचराकुंडीत जिवंत अर्भकाला फेकणाऱ्याचा छडा लागला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी टिटवाळा परिसरातून एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
Kalyan Crime
Kalyan Crimesaam tv
Published On
Summary

कल्याणमध्ये कचराकुंडीत जिवंत अर्भक फेकणाऱ्या तरुणाला अटक.

या तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते.

प्रस्तूतीनंतर मुलीच्या बाळाला आरोपीने कचऱ्यात फेकले.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kalyan News : कल्याणच्या बारावे परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी एका कचराकुंडीमध्ये गोणीत गुंडाळलेले स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात हे अपत्य अनैतिक संबंधातून जन्माला आल्याचे स्पष्ट झाले. बाळाला कचऱ्यात फेकणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन आईला पोलिसांनी ताब्यात घेतल उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रोहित पांडे या २२ वर्षीय तरुणाला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील बारावे परिसरात दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास कचराकुंडीलगत कचऱ्यातून लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. स्थानिक नागरिकांनी निरखून पाहिल्यानंतर त्यांना एका गोणीत एका दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक असल्याचे आढळले. नागरिकांनी बाळाला उचलून खडकपाडा पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

Kalyan Crime
Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला बालसंगोपन केंद्रात पाठवले आणि बाळाला कचऱ्यात फेकणाऱ्या आईवडिलांचा शोध सुरु केला. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरात चौकशी केल्यानंतर समोर आलेले सत्य पाहून पोलिसांनाच धक्का बसला. या बाळाला एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने जन्म दिल्याचे पोलिसांना तपासात समजले.

Kalyan Crime
Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, ही अल्पवयीन मुलगी घरात एकटीच राहते. ती अनाथ असून तिचे आजी-आजोबा गावी राहतात. मुलगी घरी एकटी असल्याची फायदा घेत आरोपीने तरुणीशी मैत्री वाढवली. त्यांच्या प्रेमसंबंधातून मुलगी गर्भवती राहिली. गर्भवती राहताच नऊ महिने तिला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ आरोपीने कचराकुंडीत फेकले. यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत आरोपीला टिटवाळा परिसरातून अटक केली.

Kalyan Crime
Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com